How Get Success in Network Marketing
नेटवर्क मार्केटिंग मध्ये यशस्वी कसे व्हावे
नेटवर्क मार्केटिंगचे यश अपयश हे आपण करत असलेल्या योग्य सुरुवातीवर अवलंबून असते, या क्षेत्रात येण्याअगोदर स्वतःशी एक वचनबद्धता (Commitment) केली पाहिजे ती म्हणजे अशी कि मी या व्यवसायात कमीत कमी एक वर्ष तरी काम करणारच, भले मग यात यश भेटू या न भेटू. कारण यश कधीही एका रात्रीत भेटत नाही पण एक दिवस मात्र नक्की भेटते, त्यासाठी आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते आणि संयम पण तेवढाच ठेवावा लागतो.
नेटवर्क मार्कटिंग मध्ये काम करून यश मिळवण्यासाठी खालील गोष्टींची मदत होऊ शकते ...
१) सिस्टम नुसार काम करणे - कंपनीने बनवून दिलेल्या सिस्टिम /प्लॅन नुसार काम करावे कारण प्रत्येक कंपनी पूर्णपणे विचार करूनच प्लॅन बनवत असते आपल्याला फक्त त्याची नक्कल (Duplication) करायची असते. आणि त्यासोबत तुमहाला संघटित होऊन (Team Work) कार्य करावे लागेल, तरच तुम्ही या व्यवसायात यशस्वी होऊ शकता.
२) व्यवसायासाठी योग्य वेळ देणे - मार्केटिंग च नाही तर कोणताही व्यवसाय असो त्यासाठी पुरेपूर वेळ हा देणे आवश्यक आहे. सुरवातीला आपण नवीन असतो त्यामुळे तो व्यवसाय समजण्यासाठी काही वेळ हा लागणारच आहे, व्यवसाय समजून घेतल्या नंतर तुम्ही तो तुमच्या डाऊनलाईन (Down line) ला समजावून सांगू शकता आणि भर्ती तसेच विक्री वाढवू शकता.
3) आत्मविश्वासी असावे - नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताना आपण नेहमी आत्मविश्वासी असावे, अश्या व्यक्तीच काहीतरी चमत्कार करून दाखवत असतात. आणि यासाठी आपला स्पॉन्सर हा पण तेवढाच यशस्वी असावा. कधीही नवीन मेंबरला प्लॅन दाखवताना आपल्या सोबत आपल्या अपलाइनला घेऊन जावे. तोच आपल्याला योग्य रस्ता दाखवत असतो आणि योग्य वेळी मदत पण करत असतो.
४) साहसी बना आणि निर्णय घेण्यास शिका - सुरवातीच्या काळात अपयश येऊ शकते ते पचवून साहसी बना आणि पुढील निर्णय घेण्यास शिका. नेटवर्क मार्केटिंग मध्ये निर्णय घेताना 3-SW-1 N Theory चा वापर करता येतो.
Some Will काही करतील
Some Will Not काही करणार नाहीत
So What मंग काय
Go to Next पुढे चला
५) विक्री करणे आणि विक्री वाढवणे - सुरवातीच्या काळात तुम्ही तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्टची किरकोळ (Retail) विक्री करण्यावर जोर द्यावा त्यामुळे तुमचे उत्पन्न सुरू होईल आणि तुम्हाला प्रॉडक्टची माहितीहि होईल. लक्ष्यात ठेवा कोणत्याही व्यवसायात उत्पन्न येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विक्री (Sales) त्यामुळे जो पर्यंत विक्री करत नाही आणि त्यात वाढ होत नाही तो पर्यंत तुम्ही देखील यशस्वी होऊ शकत नाहीं. तशेच तुम्ही भर्ती करणाऱ्या मेंबरला देखील हेच शिकवावे लागेल.
६) नकारात्मक व्यक्ती पासून दूर राहणे - कथित हितचिंतक जे आपल्या चांगल्याचा विचार करत असल्याचं दाखवतात पण ते नेटवर्क मार्केटिंग बद्द्ल नकारात्मक विचार मांडत असतात किंवा आपली स्वप्न विचार चोरी करत असतात अश्या व्यक्त्ती पासून नेहमी दूर रहावे. नेटवर्क मार्केटिंगला वाढ होण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो.
७) स्पॉन्सर / अपलाइनचा मान ठेवायला शिका - फक्त नेटवर्क मार्केटिंगच नाही तर कोणत्याही व्यवसायात काम करताना आपले सिनियर /स्पॉन्सर /अपलाईन यांचा मान ठेवायला शिका. आपण जे काम करतो ते पूर्णपणे १००% स्वतःच्या जबाबदारीवर करावे,त्यात मिळणारे यश-अपयश हे आपले असावे. स्वतःला किंवा दुसऱ्याला कधीही दोष देऊ नये. आपल्या अपलाईन ने दाखवून दिलेल्या रस्त्यावरून चालावे या मुळे आपला वेळ आणि मेहनत वाचते आणि यशहि वेळेत मिळते. आपण जर आपल्या अपलाईन चा मान ठेवला तरच आपले डाऊन लाईन पण आपला मान ठेवतील.
वरील सर्व गोष्टींसोबत आपण आपल्यावर आणि आपल्या कंपनी वर विश्वास ठेवणे गरचेचे आहे.

Comments
Post a Comment