How Select MLM Network Marketing Company

How Select MLM Network Marketing Company

काही नेटवर्क मार्केटिंग कंपनी  आपल्या पैशाची फसवणूक करण्यासाठी प्रयत्न करीत असतात, परंतु चांगली बातमी अशी आहे की अशा बऱ्याचं  कंपनी आहेत ज्यांचा हेतू चांगला  असू शकतो, परंतु काही  कारणास्तव ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे. तरमंग  अशा विस्तीर्ण बाजारात चांगली कंपनी  कशी समजेल?
आपण ज्या कंपनीची  संभाव्यत: निवड  करनार आहात त्याबद्दल पुढील  १० प्रश्न आहेत जे आपल्याला योग्य कंपनी  निवडण्यास  मदत करतील.

जवळपास कमीतकमी पाच वर्ष कंपनी कार्यरत आहे का ?
आपण आज केलेल्या  प्रयत्नांची भविष्यकाळात परतफेड करावयाची असल्यास आपण अशी कंपनी निवडा जी दीर्घकालीन मुदतीसाठी  कार्य केलेली  असावी. सर्व नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांपैकी जवळपास 90 टक्के कंपन्या पहिल्या दोन वर्षातच अपयशी ठरतात. अश्या कंपनीची निवड करा जी कमीत कमी पाच वर्ष तरी कार्यरत असावी.कंपनी रजिस्टर असावी.  

कंपनीकडे पुरेपूर  भांडवल आहे का?
जर कंपनी दिवाळखोर नाही, म्हणजे अश्या कंपनीचे भांडवल वाढणे आवश्यक आहे, तसेच भक्कम पायाभूत सुविधा असणे  आवश्यक आहे, प्रतिभावान व्यवस्थापन असावे जे डिस्ट्रिब्युटरा आकर्षित करणारे  आवश्यक आहे, तंत्रज्ञानाची वापरणे  आवश्यक आहे आणि आपले कमिशन वेळेत देणे आवश्यक आहे  तर आपण पुढे जाऊ शकता. सार्वजनिकरित्या व्यापार करणार्या कंपन्यांना  त्यांची आर्थिक स्थिती जाहीर करणे आवश्यक असते. दुर्दैवाने, खासगी कंपनीची वित्तीय स्तिथि लोकांसाठी उपलब्ध नाही, म्हणून आपणास अश्या कंपनीमध्ये  काम करताना  जोखीम घ्यावी लागू शकते

कंपनी अद्वितीय उत्पादने किंवा सेवा ऑफर करते?
इतरत्र सहज उपलब्ध असणारे उत्पादने किंवा सेवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी   - विशेषत: सवलती काय काय आहेत हे पाहावे, असे तर नाहीना फक्त स्पर्धेत उतरण्यासाठी आम्ही पण हि सेवा देतो अशी सांगणारी कंपनी नसावी.उत्पादन रोजच्या वापरातील असावीत. मनी लॅन्डींग कंपनी नसावी कारण ते कायदेशीर बंदी  आहे.तसेच उत्पादन हे चांगल्या प्रतीचे असावे.  
  
उत्पादन किंवा सेवेची खरी गरज आहे का?
अशी कंपनी निवडावी जी असे उत्पादन किंवा सेवा पुरवते जे आपल्या रोजच्या वापरात खरी गरज आहे. काही कंपन्या अश्या काही कहाण्या सांगून आपले प्रॉडक्ट विकतात ज्या ऐकून सामाज्यात भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे गरचेचे प्रॉडक्ट आणि तेही वाजवी किमतीमध्ये पुरवणाऱ्या कंपनीची निवड करावी कारण ग्राहक हाच खरा राजा असतो.  
तसेच, जर आपल्याकडे विक्रेत्याचा  "खास  लोकांचा वर्ग " प्रकारात प्रवेश करण्याच्या आमिषाने आणखी उत्पादने खरेदी करण्यासाठी दबाव आणला जात असेल तर  त्वरित अश्या  कंपनी  पासून दूर जा.

उत्पादन किंवा सेवा कलानुरुप  किंवा लहली आहेत  ?
जर उत्पादन किंवा सेवा केवळ अल्प-मुदत वापरातील असतील तर आपण दीर्घकालीन चालेल असे  उत्पन्न वाढवू शकत नाही.नेहमी दीर्घकालीन उत्पनाचा विचार करा. उदाहरणार्थ आरोग्य आणि निरोगीपणा श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरीकडे कल असनारे उत्पादन  .

आपण त्वरित उत्पन्न/कमिशन  मिळवू शकतो ?
अशी कंपनी निवडावी जी आपल्याला कमी वेळेत उत्पन्न मिळवून देते. नाहीतर आपण हजारो रुपये गुंतवून उत्पन्न मात्र कमी आहे.त्यामुळे कंपनीचा प्लॅन कसा आहे ते पाहावे.  

कंपनी  तंत्रज्ञानाचा पूर्ण फायदा घेते?
सध्या उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी कंपनी निवडावी. कारण आपण प्रत्येक प्रत्येक्ष  व्यक्तीला भेटू शकत नाही पण तंत्रज्ञानाचा वापर करून कंपीनीचा प्रचार करू शकतो. तसेच , कंपीनीचे प्रत्येक अपडेट आपल्याला तंत्रज्ञानाने मिळू शकते.  

कंपनीची  ओळख करुन देणारी व्यक्ती तुमच्या यशासाठी मदत करण्यात  वचनबद्ध आहे का?
कंपनीची  ओळख करुन देणारी व्यक्ती तुमच्या यशासाठी मदत करण्यात  वचनबद्ध असेल  तर कंपनी मजबूत आहे असे समजावे ,आणि उत्पादन किंवा सेवा चांगले असेल तर आपण यशस्वी व्हाल.कंपनीचे कार्य आणि कार्यप्रणालीची संपूर्ण माहिती आपणास असणे आवश्यक असते.तसेच वेळोवेळी प्रेरणा देणारे प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. 

व्यवसाय पार्ट टाइम मध्ये करता येण्यासारखा आहे का?
कंपनीकडे स्वयंचलित सिस्टम असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण पार्ट टाइम मध्ये काम करून अधिक उत्पन्न मिळवू शकतो. 

कंपनीमध्ये काम करताना आनंद मिळेल का ?
दीर्घकालीन व्यवसाय तयार करण्यासाठी आपण एकत्र काम करताना आपल्या व्यवसायातील भागीदारांसह आपल्याला आनंद आला पाहिजे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. व्यवसाय  यशस्वी करण्यासाठी आपल्याला येथे काम  करावे लागेल. योग्य नेटवर्क मार्केटिंग  करणे आवश्यक आहे.
थोडक्यात : 
अशी कंपनी निवडावी  जीचा मुख्य घटक हा प्रॉडक्ट असावा, जी कंपनी रजिस्टर असावी, विक्रीला प्राध्यान्य देणारी असावी, फक्त मेंबर जोडणारी नसावी, वेळेत कमिशन देणारी, कायदेशीर नियम पाळणारी, वेळोवेळी प्रशिक्षण देणारी, दीर्घ कालीन उत्पन्न मिळवून देणारी.  

Comments

Popular posts from this blog

What do you think of multi-level marketing?

How Get Success in Network Marketing