MLM / Network Marketing Plan
![]() |
| Generation Plan |
![]() |
| Binary Plan |
नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताना तुम्हाला दोन प्लॅन बघायला मिळतील बायनरी आणि जनरेशन प्लॅन. तसे पाहता दोन्ही प्लॅन चांगले आहेत कारण दोंघांची काहीतरी वैशिष्ट्य आहेत. दोन्ही प्लॅन मध्ये काय फायदे तोटे आहेत ते पाहूया.
बायनरी प्लॅन : या मध्ये दोन लेग असतात एक डावी आणि दुसरी उजवी, तसेच यामधून येणारे उत्पन्न हे जोडी (Pair) उत्पन्न असते यामध्ये एका लेग मधून उत्पन्न येत नाही. आणि हे उत्पन्न कंपनी नुसार वेगवेगळे असू शकते.हा फास्टेड प्लॅन आहे कारण यामधून तुम्ही कमी कालावधीत उत्पन्न मिळवू शकता. पण या प्लॅन मध्ये लॉन्ग टर्म मध्ये काम करून पण उत्पन्न तेवढच राहू शकते किंवा थोड्या ज्यास्त प्रमाणात वाढ होऊ शकते. या प्लॅन मध्ये पे आउट दर आठवड्यास असतो. नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात कमी वेळेत काम करून पैसे कमावण्याचे असल्यास बायनरी प्लॅन मध्ये काम करावे.
----------------------------------------------------****-----------------------------------------------------
जनरेशन प्लॅन: या मध्ये दोन पेक्षा ज्यास्त लेग बनवता येतात तसेच या प्लॅन मधून येणारे उत्पन्न हे टक्केवारीवर अवलंबून असते. ही टक्केवारी प्रत्येक कंपनीची प्रत्येक लेगनुसार वेगवेगळी असू शकते. पण उत्पन्न मात्र एका लेग मधून पण मिळू शकते. हा थोडा स्लो प्लॅन आहे कारण उत्पन्न वाढण्यासाठी तुम्हाला लेग पण वाढवाव्या लागतात कारण प्रत्येक लेग ची टक्केवारी वेगवेगळी असते. पण या प्लॅन मध्ये लॉन्ग टर्म मध्ये काम करून तुम्ही अधिक उत्पन्न मिळवू शकता. कारण जेवढी तुमची डाऊनलाईन वाढेल त्या प्रमाणात तुमची टक्केवारी पन वाढेल. या प्लॅन मध्ये पे आउट दर महा असतो. नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात लॉन्ग टर्म मध्ये काम करून करीअर बनवायचे असेल तर जनरेशन प्लॅन मध्ये काम करावे.
पुढे पहा पीव्ही आणि बीव्ही


Comments
Post a Comment