How Get Success in Network Marketing
नेटवर्क मार्केटिंग मध्ये यशस्वी कसे व्हावे नेटवर्क मार्केटिंगचे यश अपयश हे आपण करत असलेल्या योग्य सुरुवातीवर अवलंबून असते, या क्षेत्रात येण्याअगोदर स्वतःशी एक वचनबद्धता (Commitment) केली पाहिजे ती म्हणजे अशी कि मी या व्यवसायात कमीत कमी एक वर्ष तरी काम करणारच, भले मग यात यश भेटू या न भेटू. कारण यश कधीही एका रात्रीत भेटत नाही पण एक दिवस मात्र नक्की भेटते, त्यासाठी आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते आणि संयम पण तेवढाच ठेवावा लागतो. नेटवर्क मार्कटिंग मध्ये काम करून यश मिळवण्यासाठी खालील गोष्टींची मदत होऊ शकते ... १) सिस्टम नुसार काम करणे - कंपनीने बनवून दिलेल्या सिस्टिम /प्लॅन नुसार काम करावे कारण प्रत्येक कंपनी पूर्णपणे विचार करूनच प्लॅन बनवत असते आपल्याला फक्त त्याची नक्कल (Duplication) करायची असते. आणि त्यासोबत तुमहाला संघटित होऊन (Team Work) कार्य करावे लागेल, तरच तुम्ही या व्यवसायात यशस्वी होऊ शकता. २) व्यवसायासाठी योग्य वेळ देणे - म...